न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- काळेवाडी तापकीर नगर येथील कै. सौ. लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयात मच्छिंद्रतात्या तापकीर सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने लक्ष्मीबाई तापकीर यांच्या पुण्यतीथी संगीत भजनाचा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी विरोधीपक्ष नेते मच्छिद्र तापकीर व माजी नगरसेविका अनिता तापकीर यांच्या हस्ते लक्ष्मीबाई तापकीर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोमनाथ तापकीर, सागर तापकीर, परिसरातील राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विध्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्ताने गायिका आश्विनी मिठे व आरती मिठे यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मराठी अभंग, गवळणी, लोकगीते साजरा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, अनेक विध्यार्थ्याणी लोकगीतांवर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला .त्याचा बरोबर विद्यालयात वक्तृत्व,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या विजयी विध्यार्थ्याना पारितोषिक देण्यात आले.सर्व विध्यार्थी ,पालक व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.












