न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेतील १२५ नगरसेवकांसह त्यांच्या कुटुबियांसाठी उतरविलेल्या आरोग्य विमा योजनेला एक वर्षाची मदतवाढ देण्यात आली आहे. नगरसेवकांचा वार्षिक पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून पुढील एका वर्षासाठी येणाऱ्या ४९ लाख २४ हजार रुपयांच्या आयत्या वेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.
स्थायी समितीची साप्ताहिक सभ (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२८ असून ५ स्वीकृत सदस्यासह एकूण १३३ नगरसेवक आहेत. यापैकी १२५ नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारली आहे. तर, आठ नगरसेवकांनी सवलत नाकारलेली आहे. १२५ नगरसेवकांना त्यांच्यासह कुटुंबियांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू केली आहे. नगरसेवक पती – पत्नी आणि त्यांच्या २१ वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी विमा योजना लागू आहे.
विमा योजनेची एक वर्षाची मुदत १८ डिसेंबर २०१९ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आरोग्य विमा योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी करारनामा करण्यात येणार आहे. एकूण त्यासाठी ४९ लाख २४ हजार यापैकी ७३० रुपये खर्च येणार आहे. विमा इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीमार्फत विमा उतरविण्यात येणार आहे. येणाऱ्या खर्चातील ७५ टक्के रक्कम व्यासह डिसेंबर २०१९ आणि २५ टक्के रक्कम ३१ मार्च २०२० पर्यंत अदा करण्यात येणार आहे. याबाबतच्या आणि प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.


















