न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कुदळवाडी भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिसरातील नागरिकांना पुस्तके, पेपर वाचन करण्याकरिता बाहेर जावे लागते. त्यासाठी कुदळवाडीत वाचनालयाचे केंद्र सुरु करावे, अशी मागणी ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात यादव यांनी म्हटले की, ‘कुदळवाडीतील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महीला या सर्व स्थानिक नागरिकांना वाचनाची आवड आहे. परंतु, वाचनालय नसल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. याबाबत सर्व नागरिकांच्या मागणीचा विचार करुन वाचनालयासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करावी. व तिथे नागरिकांकरिता वाचनालय सुरु करावे, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.


















