- नवनिर्वाचित महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांचे आयोजन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी आज गुरुवारी महापालिकेच्या आजी-माजी महापौरांना चहापानासाठी निमंत्रीत केले होते.
यावेळी माजी महापौर अर्पणा डोके, राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते विठठल ऊर्फ नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास ऊर्फ बाबा बारणे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पदाची सूत्रे हाती येताच ‘पोलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ या अंतर्गत सर्वांशी समोपचारांची भूमिका घेतल्याचे दिसते. यावेळी आजी-माजी महापौरांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा यावेळी देत, त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या विविध विषयांवर चर्चा केली.


















