- २०२२ च्या महापालिका निवडणुका होणार वार्ड पद्धतीने….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- राज्यातील महापालिकांतील चार सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर यासंदर्भातील विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडले. हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. प्रभागात चार नगरसेवक असल्यामुळे प्रभागातील समस्या व विकासाची जबाबदारी प्रभागातील नगरसेवक एकमेकांवर ढकलत असल्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ साली महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत सुरू करण्यात आली होती. या पद्धतीचा भाजपला फायदा झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडीने पुन्हा एकदा निवडणुकीचा जुना फाॅम्युला सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता प्रत्येक प्रभागात एकच नगरसेवक होणार आहे.


















