न्यूज पीसीएमसी नेटवर्क
- आत्महत्या करीत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून सांगुर्डी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने इंदोरी (ता. मावळ) येथील ब्रिटिशकालीन पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून आज (रविवारी) सकाळी आत्महत्या केली. प्रेमभंगातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
समीर एकनाथ भसे (वय २३ रा. सांगुर्डी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास शोध पथकाला त्याचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले.
हा निर्णय घेतला आहे. नाना – मम्मी मला माफ करा, मी तुम्हाला सोडून चाललोय.’
समीरने MH14 EX 4944 ही दुचाकी इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावर लावली. दुचाकीवर देखील आत्महत्या करीत असल्याचे पत्र ठेऊन त्यावर दगड ठेवला व सकाळी दहाच्या सुमारास इंद्रायणी नदीमध्ये उडी मारली. स्थानिक मच्छीमारांनी समीरला वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. समीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकलेल्या विविध पोस्टवरून, त्याला प्रेमभंगामुळे नैराश्य आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्याच्या १० मिनीट अगोदर सोशल मीडियावर वाढदिवस केक, गिफ्ट्स, चेहरे लपवलेले तरुण-तरुणी यांचा फोटो अपलोड करुन समीरने जीवन संपवले. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शन खाली तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












