न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०१९) :- पिंपरीतील मोरवाडी येथे पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक दळवी (२९) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.
मयत अभिषेकचे वडील अजित दळवी हे सांगली जिल्ह्यात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. आत्महत्या करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. दरम्यान अभिषेकने आत्महत्येपूर्वी मद्यपान केले होते अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. अद्याप अभिषेकने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.












