न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहासमोरील एक्सिस बँक येथे चिंचवड स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने वाहतूक पोलिसांना गुंगारा देत, काही अंतरावर जाऊन भर रस्त्यात यु टर्न घेत बँकेसमोरील पार्किंगमधील वाहनास धडक देत काही वेळ थरार निर्माण केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, पार्किंगमधील व्हेगन आर या चार चाकी वाहनाचे नुकसान झाले.
प्रत्यक्षदर्शिनी माहिती देताना सांगितले की, मद्यधुंद अवस्थेतील ह्युंदाई आय २० (एमएच १४ एफएम ७००२) हे वाहन भरधाव वेगाने रस्त्यावरून जात होते. कारमधील दोन्ही तरुण दारू पिऊन कार चालवत होते. कर अचानक रस्त्यावरून एक्सिस बँकेच्या दिशेला वळवत नेली. समोरच पार्क केलेल्या काही वाहनांमधील एका वाहनाला या कार ने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, समोरील कारचे काही स्पेअर पार्ट उडून रस्त्यावर अस्थाव्यस्थ पडले. वाहतूक पोलिसांनी वेळीच येत मद्यधुंद दोन्ही तरुणांना चौकीस नेले.















