न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या डॉ.वैशाली घोडेकर, अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दूरगुडे, अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.
पिंपरी चौक येथील त्यांच्या प्रतिमेस व महात्मा फुले यांच्या पुतळ्यासही महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते विठठल ऊर्फ नाना काटे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या अपर्णा डोके, डॉ.वैशाली घोडेकर, अनुराधा गोरखे, नम्रता लोंढे, अश्विनी जाधव, संगिता ताम्हाणे, माधवी राजापुरे, माजी महापौर अनिता फरांदे, माजी नगरसदस्या सुलभा उबाळे, उषा गजभार, सहाय्यक आयुक्त आशादेवी दूरगुडे, अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आनंदा कुदळे, संतोष जोगदंड, बापूसाहेब गायकवाड, गिरीष वाघमारे, विलास गव्हाणे, काळूराम गायकवाड, हनुमंत माळी, प्रताप गुरव, विशाल जाधव, नरहरी शेवते, रोहिदास भुजबळ, लहू अनारसे, धम्मराज साळवे, देवेंद्र तायडे, सुनिता जुन्नरकर, निलिमा क्षिरसागर,सूमन नवले, उज्वला भुजबळ, अलका ताम्हाणे, स्मिता माळी, आशा माळी, शकुंतला शेवते, चंद्रकला गव्हाणे, निर्मला ताम्हाणे, रत्नप्रभा भुजबळ, विमल माळी, सिमा कर्णे आदी उपस्थित होते
तसेच मनपा शाळा मोशी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, प्रफुल्ल पुराणिक, मुख्याध्यापक विठठल मुंढे, सह शिक्षक दत्तात्रय दांगडे, सामाजिक कार्यकर्ते दिलिप बोराटे, अरुणाताई बोराटे, अंजली अल्हाट, संगिता बोराटे, प्रतिभा हिंगणे, हिराबाई थोरात, सारिका बनकर व मोठया संख्येने विदयार्थीनी उपस्थित होत्या.












