- पिं. चिं. ॲड. बार असो. चे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर यांच्या हस्ते ध्वजरोहण
- चिंचवड येथील चाफेकर वाडयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- एकाच मातेचे तीन सुपुत्रांनी एका वेळी इंग्रजांशी झुंज दिली, त्यानंतर फासावर गेले अशा चिंचवड भुमितील चाफेकर वाडयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर व उपाध्यक्ष ॲड. अतुल अडसरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सर्वांचे हस्ते भारत मातेस वंदन करून पुजन करण्यात आली.
यावेळी चाफेकर स्मारक समितीचे गतीराम भोईर, आसाराम कसबे, नितीन बारणे, नगरसेविका आश्विनीताई चिंचवडे, बासंती तिकोणे, संजय कुलकर्णी, ॲड. सतिश गोरडे तसेच क्रांतीवीर चाफेकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थि व शिक्षक वर्ग उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व सांगितले की, ” भारतमाता ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक संकल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्यामागे आहे, त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्रांचे वा मूर्तीचे प्रतिकात्मक पूजन हे अन्य देवतांप्रमाणे करण्याची परंपरा स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सुरू झाली व तीच आपण आज सुद्धा चालू ठेवली पाहिजे. तसेच तसेच भारत हा एक विवीधतेने नटलेला देश असुन या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच, भाषेचे लोक एकत्रित राहात आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी १९४९ रोजी राज्यघटनेची अमंलबजावणी करण्यात आली व लोकांकरवी राज्य चालविले गेले. म्हणजेच प्रजेच्या हाती सत्ता दिली गेली. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे व भारत मातेचे रक्षण केले पाहिजे.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आसाराम कसबे यांनी केले.


















