न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत (दि.२६/०१/२०२० रोजी) पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रीय ध्वजा रोहण झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कामगार सेल अध्यक्षपदी किरण चंद्रकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पक्षाचे पिपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस संघटक व कामगार नेते अरुणजी बो-हाडे,महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोकले यांच्या मार्गदर्शना खाली तसेच पक्षाचे इतर सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत किरण चंद्रकांत देशमुख यांनी पदभार स्वीकारला.
पक्षाचे प्रवक्ते फाजल भाई, जेष्ठ नेते महमदभाई पानसरे, विजय लोखंडे, लिगल सेल अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, कांबळे, दत्तात्र्य जगताप, शेख, पारेख, शिंदे, कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे, महिला पदाधीकारी कविता खराडे, निर्मला माने, मनिषा घटकळ, जाधवताई, शिल्पा बिडकर, पाडाळेताई उपस्थित होते.
“पिंपरी-चिंचवड ची ओळख ही कामगार नगरी आसल्याने कामकामगार हिताचे सर्व प्रश्न पक्षाच्या पुढाकारतुन सोडवण्यासाठी कायम कटिबध्द व तत्पर राहीन. पक्षाने दिलेली ही जबाबदारी “कामगार हिताय कामगार सुखाय” हे ब्रीद घेऊन सदैव कार्यरत राहीन” असे मत श्री किरण चंद्रकांत देशमुख यांनी व्यक्त केले.











