न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०१९) :- इंडियन प्रिमीयर लीग अर्थात ipl २०२० ही स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतला अंतिम सामना म्हणजेच फायनल मॅच २४ मे रोजी मुंबईत होणार आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ipl २०२० मध्ये फक्त पाच दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होईल.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मुंबईला मिळालेला आहे. याचसोबत बैठकीत सामन्यांची वेळ रात्री ८ हीच कायम ठेवण्यात आलेली आहे. या हंगामात केवळ ५ Double Header सामने होतील, अशी माहिती बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पत्रकारांना माहिती दिली.















