न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- कल्पेश हे २३ जानेवारी रोजी सकाळी बेंगलोर येथे गेले. तसेच त्यांच्या आई देखील त्याच दिवशी औरंगाबाद येथे गेल्या होत्या. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते.
अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून त्याद्वारे घरात प्रवेश केला. घरातील खालच्या व वरच्या बेडरूममध्ये लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ७१ तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १० लाख रुपये रोख रक्कम असा एकूण ३९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
फिर्यादी कल्पेश रविवारी सकाळी गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. २६) सकाळी दहाच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे उघडकीस आला आहे. कल्पेश सुरेश अनफळकर (वय २९, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.















