न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२०) :- बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
वसीम शफिकोद्दीन मणियार (वय २५, रा. जुनी सांगवी), अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराते (वय २१, रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंतकुमार प्रकाश गुत्तिकोंडा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.












