न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२०) :- वेतनवाढीच्या प्रश्नावर अपेक्षित तोडगा न निघाल्याने बॅंक कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजेच ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला बॅंका बंद राहणार आहेत. तसेच, रविवार लागून आल्याने सलग तीन दिवस सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे व्यवहार ठप्प होतील.
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) या संदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर बॅंकांनी ग्राहकांना याबाबत माहित दिली असून, बॅंकिंग व्यवहार आटोपून घेण्याचे आवाहन केले आहे.















