न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त
आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.