न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्लूडी मैदान येथे पवनाथडी जत्रा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी अर्जाची मुदत वाढविण्यात आली असून महिला बचत गट ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्याच्या विक्रीसाठी पवनाथडी जत्रेत मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी शहरातील गटांकडून २४ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. एकूण ६७३ अर्ज मुदतीत प्राप्त झाले आहेत. आता अर्ज करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बचतगटांनी पालिका भवनातील तळमजल्यावरील नागरवस्ती विकास योजना विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे. पात्र अर्जातून छाननी करून सोडत पद्धतीने स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. ही जत्रा मार्च महिन्यात आयोजित करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.












