न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी :- आकुर्डी येथील सेंट उर्सूला शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या हर्षल विश्वास कांबळे (वय १३) रा. बारलोटानगर, गायत्री कॉम्प्लेक्स, देहूरोड. या विद्यार्थ्यास शाळेच्या शिक्षिकेने मारहाण केली आहे.
शिक्षिकेच्या मुलाला मारहाण झालेल्या मुलाने ‘गे’ असे म्हणल्यामुळे ही घटना घडली आहे. अंतर्गत रक्तश्राव झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यास रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले आहे.
यासंबंधी विद्यार्थ्याच्या आईने निगडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी ही माहिती दिली असून, पुढील तपास चालू आहे.
















