न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील ज्येष्ठ नागरीक तथा रहिवासी यांना या पी.एम.पी.एम.एल. मिनी बस सेवेचा प्रवासासाठी फायदा होईल. या बसेसचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
आज बिजलीनगर ते चिंचवडगाव या दरम्यानच्या पी.एम.पी.एम.एल. मिनी बस सेवेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. या समारंभाच्यावेळी प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, न्यु इंग्लिश स्कूलचे विश्वस्थ निळकंठ चिंचवडे, स्विकृत नगरसदस्य बिभीषन चौधरी, माहिती व जन संपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, प्रशांत चिंचवडे, सचिन काळभोर, ज्येष्ठ नागरीक संघाचे प्रकाश निसळ, जयवंत भोसले, हेमंत ननावरे, शत्रुघ्न भराटे, शाम चिंचवडे, संजय पडवळ, ऋतुराज बलकवडे, अनिल चिंचवडे, सुनिता जयवंत, वैशाली पडवळ, उमा पडवळ, संगिता साठे, आशा चिंचवडे, संगिता अगरवाल, प्रियंका जाधव, रत्ना चव्हाण, सुनिता साठे आदी उपस्थित होते.
याच बरोबर बिजलीनगर हनुमान स्विट्स चौक येथील ई-टॉयलेटचे लोकार्पण शुभारंभ तसेच रघुमाऊली गार्डन, सुखनगरी, बिजलीनगर येथील ओपन जिमचे उद्घाटनही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.















