न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रुवारी २०२०) : कासारवाडी, दापोडी भागातील पाणीपुरवठा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
पिण्यापुरते देखील पाणी नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आज पाण्याच्या टाकीमधील खोलीत अधिका-यांना कोंडले.
महापालिकेचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना देखील कोंडले. जोपर्यंत टाकी भरत नाही. तोपर्यंत अधिका-यांना बाहेर सोडणार नाही, असा पवित्रा शेंडगे यांनी घेतला होता. सत्ताधारी नगरसेविकेच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.















