- महिला, लहान थोरांपासून सर्वांसाठी गावजत्रेत कार्यक्रमांची मेजवानी – स्वी. नगरसेवक संदीप नखाते….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२०) :- स्वीकृत नगरसेवक संदिप नखाते, विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्ते देविदास तांबे यांच्या संकल्पनेतून रहाटणीत शुक्रवारी (दि. ७ ते १६ फेब्रुवारी) दरम्यान गावजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
रहाटणीमधील कोकणे चौकातील आकाशगंगा गार्डन परिसरातील गावजत्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान कार्यक्रमात मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांची स्पर्धा, डान्स कॉम्पिटेशन, फैशन – शो, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, गाण्यांची स्पर्धा व विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. खास मुलांसाठी मामाचं गाव आणि गावातील मज्जा. .. ! हरवलेल बालपण. या खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
महिलांना रोजगार निर्मितीसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. परिसरातील महिला, लहान थोरांपासून सर्वांसाठी कार्यक्रमांची मेजवानी या गावजत्रेत असणार आहे. अधिक माहितीसाठी ७८८८०९६१११ / ७८८८०९७१११ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन स्वीकृत नगरसेवक संदिप नखाते यांनी केले आहे.















