न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १५ टिळक चौक येथे लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणेकामी येणाऱ्या ३८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासह शहरात करण्यात येणा-या इतर विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे २६ कोटी ७५ लाख इतक्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
प्रभाग क्र. १० चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद पुतळ्याचे शुशोभिकरण व नुतनीकरणाचे कामे करणेकामी येणाऱ्या ३३ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. वाकड येथील आरक्षण क्र. ३/१८ येथे उद्यान विकसित करणेकामी येणाऱ्या ७ कोटी ४४ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १६ रावेत येथील पेठ क. ३२ अ मधील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणेकामी येणाऱ्या ५ कोटी ७६ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयातील नव्याने ताब्यात येणाऱ्या उद्यानांच्या आरक्षित जागांना सिमाभिंत बांधणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २ कोटी ४७ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपा प्रशासकिय इमारतीमध्ये आवश्यकतेनुसार अत्याधुनिक उदवाहक बसविणे व अनुषंगीक कामे करणेकामी येणाऱ्या ४९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाच्या अ, ब व फ प्रभागातील मैला पंपीग स्टेशनसाठी आवश्यकतेनुसार जादा क्षमतेचे सबमर्सिबल पंप बसविणेकामी व अनुषंगीक कामे करणेकामी येणा-या ५७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्र.क्र १८ अंतर्गत येणाऱ्या पवना नदीच्या बाजूने जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणा-या ५४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २७ रहाटणी मधील गजानननगर, नखातेनगर, दत्तनगर व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्था सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ५९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या क, ड, ई व ह प्रभागातील मैला पंपीग स्टेशनसाठी आवश्यकतेनुसार जादा क्षमतेचे सबमर्सिबल पंप बसविणेकामी व अनुषंगीक येणाऱ्या ८५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१० मधील मोरवाडी परिसर व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २५ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. भाटनगर मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.९ मधील गांधीनगर, खराळवाडी व उर्वरित परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ३३ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १३ निगडी, यमुनानगर व परिसरातील चेंबर्स व ड्रेनेज लाईनची आवश्यकतेनुसार देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या ३० लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १ चिखली परिसरातील चेंबर्स व ड्रेनेज लाईनची आवश्यकतेनुसार देखभाल दुरस्ती करणेकामी येणाऱ्या ३२ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३२ मधील एम.एस.काटे चौकालगत नाला बंदिस्त करणेकामी येणाऱ्या ५५ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २४ मधील थेरगाव मधील जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१९ मधील श्रीधरनगर परिसर व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ३० लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.९ मधील विठ्ठलनगर, आंबेडकरनगर व उर्वरित ठिकाणी जुन्या मलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४५ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. बी.आर.टी.एस रस्ता ते सावतामाळी उद्यानापर्यंत नाल्यामधील जलनि:सारण नलिकांचे सुधारणा विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ४० लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १० या प्रभागातील सार्वजनिक शौचालय व मुतारी यांची दैनदिन साफसफाई करणेकामी येणाऱ्या १ कोटी ८६ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १९ या प्रभागातील सार्वजनिक शौचालय व मुतारी यांची दैनदिन साफसफाई करणेकामी येणाऱ्या १ कोटी ९२ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.















