- शिवसेनेची पुलवामा हल्ल्यात शहीद वीर जवानांना आदरांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- शिवसेनेच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि काळेवाडी – रहाटणी विभागाच्या वतीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे संघटक हरेश नखाते, विभागप्रमुख गोरख पाटील, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, गणेश वायभट, आदिक भोसले, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, नरसिंग माने, जेष्ठ नागरिक पद्माकर जांभळे, लक्ष्मण मंजाळ, अतुल नढे, प्रभाकर गुरव, आबा शिंदे, काशिनाथ पाळंदे, पतंगराव सुतार, विनायक पाळंदे, दिलीप पंडित, अरुण बकाल, भारत गांगुर्डे, विष्णू कोपरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रांगोळीने भारताचा नकाशा काढून त्यावर फुलांच्या पाकळ्या सजविण्यात आल्या होत्या. तसेच शहीद जवानांना मेणबत्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशावर वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवादी पाकड्यांना कायमचे ठेचावे, अशी संतप्त भावना हरेश नखाते यांनी यावेळी व्यक्त केली.