न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. भारतात देखील हा व्हायरस दाखल होण्याची शक्यता आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव व प्रतिबंध नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत होती.
या मागणीची दाखल घेत व्हायरसच्या दक्षतेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालयामध्ये तातडीने संशयीत कोरोना रुग्णांसाठी १५ बेडचा अतिदक्षता कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती वायसीएमएचचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.