न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधनपर्वानिमित्त दि. १६ व १९ फेब्रुवारी दरम्यान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून मराठ्यांची गौरवगाथा या २५० कलाकारांचा सहभाग असलेला सुप्रसिद्ध महानाट्याचा कार्यक्रम १८ व १९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित केला असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट् राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, हे लाभणार असून प्रमुख उपस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे असणार आहेत. तर विशेष उपस्थितीमध्ये खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मा. अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या शैलेजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे, राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
यापुर्वी शाहीर सुरेश सुर्यवंशी यांच्या रणगाथा शौर्याची या शाहीरीने प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. रविवार दि. १७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील हे भक्ती- शक्ती एक प्रेरणा या विषयावर व्याख्यान देणार असून १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध महानाट्य मराठ्यांची गौरवगाथा- एक महानाट्य (भाग -१) २५० कलाकार, जिवंत पाळीव प्राणी ५ घोडे, ४ उंट, १ बैलगाडी, १ तोफ दोन मजली रंगमंचावर सादर होणार आहे.
तसेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ढोल ताशा स्पर्धा, शिवरथ- वारकरी सोहळा, श्री. दुधे संगमनेर यांचे मर्दानी खेळ होणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध महानाट्य मराठ्यांची गौरवगाथा- एक महानाट्य (भाग -२) २५० कलाकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.