न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- आकुर्डीत अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यावर अचानक टेम्पो चाकलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला कलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
चिंचवड गावातून आकुर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबामाळ चौकालागत आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाता नंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
चिंचवडकडून आकुर्डीकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वराला धडकत बाजूला असणाऱ्या दुकानात घुसला. दुकानाबाहेर उभ्या असणारे चार जण या घटनेत जखमी झाले. अपघाताच्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भागात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.












