न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद , पिंपरी – चिंचवड व पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आयोजित तसेच श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान प्रायोजित २१ व्या कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि. २०) रोजी परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत झाले.
चिंचवड यांचे ऋषी सुतार व समर्थ कलाविष्कार संस्थेचे माधव जोगळेकर या बॅकस्टेज कलाकारांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे सुहास जोशी, किरण येवलेकर, संतोष पाटील, संतोष शिंदे, गौरी लढि, राजेंद्र बंग, नितीन शिंदे, महेश लाकाळ, रुपाली पाथरे, अजय ढवळे व रघु ढेमरे उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण २६ एकांकिका सादर होणार आहेत. उद्घाटनानंतर एकांकिका सादर झाली. आपल्या प्रास्ताविकात जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धातील एकांकिकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.











