न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- तडीपार गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून पाच दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक महागडे घड्याळ आणि रोख रकम असा दोन लाख ६० हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली आहे. सुरज उर्फ सुरज्या चंद्रकांत कुन्हाडे ( वय २१ , रा . बालाजीनगर , झोपडपट्टी , भोसरी ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी विजय दौंडकर आणि नवनाथ पोटे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली की, एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार भोसरी परिसरात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करून चौकशी केली.
आरोपीने एमआयडीसी , फुलेनगर , शाहूनगर , नेहरूनगर , पिंपरी येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी , एक अॅपल कंपनीचे पाच सिरीज सेल्युलर मनगटी घड्याळ आणि रोख रकम असा एकूण दोन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील सहा आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप विष्णोई , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त स्मिता पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे , निरीक्षक ( गुन्हे ) सतीश नांदुरकर , उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे , कर्मचारी रवींद्र तिटकारे , भोर , नवनाथ पोटे , विजय दोडकर , करन विश्वासे , अनिल जोशी , केली आहे











