न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- राजीनामा दिल्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन महत्त्वाची कागदपत्रे फाडणाऱ्या व काहींना सोबत घेऊन जाणाऱ्या एका डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी एमआयडीसी येथील संत ज्ञानेश्वर रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता.
या प्रकरणी विद्याधर प्रभाकर सरफरे यांनी फिर्याद दिली असून डॉ. जवाहर भळगट आणि संदीप पिसाळ (रा. साईपार्क, सैनिक कॉलनी दिघी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरीतील संत ज्ञानेश्वर रुग्णालयातील नोकरीचा पिसाळ याने राजीनामा दिला आहे. त्यानंतर डॉ. भळगट यांच्या सांगण्यावरून पिसाळने रुग्णालयात येऊन कपाटातील महत्त्वाची कागदपत्रे फाडून टाकली. तसेच, काही कागदपत्रे सोबत नेली. कपाटाच्या चाव्या डॉ. भळगट यांच्याकडे दिल्याचे सरफरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.












