- नगरसेवक मयूर कलाटे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी व मुठा नदींच्या पात्रांमध्ये जलपर्णी पसरलेली आहे. नदीचे पात्र सुध्दा ओळखू येत नाही, अशी परीस्थिती झालेली आहे.
जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी निविदा काढली जाते. परंतु, ठेकेदार जुजबी काम करुन जलपर्णी न काढता पावसाळ्याची वाट पाहतो. पूरांच्या पाण्यामुळे जलपर्णी वाहून जाते. व ठेकेदार काम न करता निविदेचे पैसे मनपाकडून घेतात. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होते.
त्यामुळे शहरातील नागरीकांना या जलपर्णीचा खूप त्रास होतो. जलपर्णीमुळे डांस, मच्छरची पैदास होते. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. रावेत जलशुध्दीकरण प्रकल्पाभोवतालच्या परीसरातील तसेच शहरातून वाहणा-या नद्यांमधिल जलपर्णी तातडीने काढण्याबाबतचे संबंधितांना आदेश निर्गत करण्यात यावेत, अशी मागणी स्थायी सदस्य व नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.












