- जनतेचा विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – नगरसेवक शैलेश मोरे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्य व पिंपरी चिंचवड शहरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज मंगळवार (दि. २५) रोजी सकाळी ११.०० वाजता आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विलास मडेगिरी, उमा खापरे, सदाशिव खाडे, अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, अमोल थोरात, एकनाथ पवार, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, माऊली थोरात, बाबू नायर, शैला मोळक तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनींनी एकत्रित येऊन या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान करून, सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात व शहरात महिलांवरील अत्याचार वाढ झाली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जनतेचा विश्वासघात करणारे हे सरकार लबाड आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून या लबाड सरकारला लवकरच जनता त्यांची जागा दाखवून देईल.
– शैलेश मोरे (नगरसेवक, पिं. चिं. मनपा) ..















