न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- स्थळ च-होली. श्री वाघेश्वर विद्यालय, वेळ सकाळी आठची. . शाळेच्या प्रवेशद्वारासमोर काढलेली सुंदर रांगोळी. . पाहुण्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांची धावपळ आणि उत्साह. शाळेची घंटा वाजली तसे शाळेतून १० उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी कार्यक्रमस्थळी आले अन् शाळेत केलेली धमाल, जुने सहकारी मित्र – मैत्रिणी, शिक्षकांनी केलेले संस्कार अशा जुन्या आठवणींमध्ये रमले. . . .
एकदा शाळेतून उत्तीर्ण होउन बाहेर पडले की विद्यार्थी पुन्हा त्या विद्यालयाशी फार संपर्कात नसतात. जो – तो आपल्या कामात व्यस्त होउन जातो. मात्र, यालाही काही अपवाद असतात. काही विद्यार्थी सवड काढून जुने मित्र – मैत्रिणी, आपण जेथे शिक्षण घेतले, ज्या गुरूजनांनी आपल्याला घडवले अशा शाळेशी, शिक्षकांशी संवाद साधत असतात. असाच स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम च-होलीतील श्री वाघेश्वर विद्यालयात नुकताच झाला. १९८६ मध्ये शाळेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – विद्यार्थीनी कार्यक्रमास उत्साहाने उपस्थित राहिले.
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका शेवाळे आणि विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी तसेच निवृत्त शिक्षकांचे स्वागत केले. यामध्ये निवृत्त मुख्याध्यापक के . के . निकम , प-हाड सर , आधाट सर , साबनकर , वाखारे , माळवदे , कुंभार , जगताप , तांबे , ठोंबरे , खोसे , सपकाळ सर , बो-हाडे मॅडम यांचा समावेश होता. माजी विद्यार्थीनी तसेच मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असलेल्या अॅड. राजश्री चव्हाण, पोलीस दलातील पोपट रासकर, भाउसाहेब घारे, उद्योजक नितीन चोरडीया, सुनिल आघाटे, सुर्यकांत पटेकर, नटराज पवार, मोहन तापकीर, संतोष काळजे, किसन राउत, संजय दळवी, सुनिल गाढवे, ह . भ . प . सुनंदा तापकीर, सोनाली जोरे, सनिता तापकीर संगिता तापकीर, प्रा. संगिता उपरे, चंद्रकात तापकीर, संतोष बोरीकर, डॉ. ललित धोका, दामू तापकीर आदी स्नेहमेळाव्यात सहभागी झाले.
विद्यार्थी आणि शिक्षकांना पुन्हा एकदा भेटण्याचा योग ३४ वर्षांनी जुळून आला. त्याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणी, शाळेत केलेली धमाल याचे किस्से सांगण्यात आणि ऐकण्यात शिक्षक – विद्यार्थी रमून गेले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक के . के . निकम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिक्षक – विद्यार्थी यांचा शाल – श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. १९८६ मध्ये शिक्षण घेणारे परंतु, हयात नसलेले विद्यार्थी, शिक्षक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास १०९ माजी विद्यार्थ्यांपैकी ८१ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन निर्मला चोरडीया, डॉ. स्वप्नाली धोका यांच्या मार्गदर्शनाखाली नंदा ढोरजे, संगिता रासकर, दत्ता ताजणे, राजू मुलाणी, दिलीप आढाव, राजू फुले, उदय शिंदे, अकबर मलाणी, सुधीर पठारे, वाघेश्वर रासरकर, विजया तापकीर, कृष्णा रासकर, शिवाजी झोरे, मोहन वारे, शिंदे, अकबर मुलाणी, सुधीर पठारे, सुर्यकांत धोका, सुनिल आढाव यांनी केले. यावेळी झालेल्या कविसंमेलनात वर्षा तापकीर, दर्शना ताजणे, कविता रासकर, छाया रासकर, सुवर्णा रासकर, वैशाली फुगे यांनी सहभाग घेतला. यावेळी ज्या विद्यालयात आपण शिकलो ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले, चांगले संस्कार केले, अशा श्री वाघेश्वर विद्यालयास सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय उपस्थितींनी व्यक्त केला.
शिक्षकांना, सवंगडयांना दिर्घायुष्य लाभे, तसेच पुन्हा परत भेटण्याचे आश्वासन गुरूशिष्यांनी एकमेकांना दिले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. आपले जुने सवंगडी आता कुठे असतील, ते पुन्हा भेटतील का, असा विचार काही वेळा येतो. परंतु व्हॉटस् अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला तर पुन्हा एकदा गप्पांचा फड रंगवता येतो हे वाघेश्वरच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यातून दाखवून दिले.















