न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाच्या पहिल्या पानांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला. तर तिसर्या पानांवर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापण्यात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेत याबद्दल निषेध नोंदवला.
याबाबत खुलासा द्यावा, अन्यथा आम्ही सभागृह चालू देणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे काहीकाळ सभागृहाचं कामकाज थांबविण्यात आले होते.















