न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवडमधील शाळा व महाविद्यालय परिसरात अनेक विद्यार्थी मनमानी पद्धतीने वाहने चालवत असल्याचे प्रकार वाढले होते. यावर कारवाई करण्यासाठी चिंचवड वाहतूक शाखेने आज कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत तब्बल २१ अल्पवयीन वाहन चालकांच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.
रस्त्यावरील टवाळखोरी व वाढत्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक शाखेने अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या पुढे पुन्हा चुका करणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी कबुल केले. वाहन परवाना असल्याशिवायात मुलांच्या हातात वाहने देऊ नये असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक खंडेराव सेरे. उपनिरीक्षक मनीषा हाबळे. एस. जाधव कर्मचारी तौसीफ महात, खंडेराव नलगे, आबासाहेब सावंत, एस. बी. कांबळे, अमृता मतरे यांनी केली.