- पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील अर्धवट गार्डन डीवाईडरच्या कामाला हिरवा कंदील..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- महापालिकेच्या पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील चऱ्होली फाटा ते दिघी, दत्तनगर या मुख्य सेवा रस्त्याशेजारील अर्धवट गार्डन डीवाईडरच्या कामाची उद्यान विभागाचे ‘ ई ‘ प्रभागाचे वृक्षसंवर्धन पर्यवेक्षक गायकवाड यांनी पाहणी केली.
सर्व डीवाईडर काउंटिंग करून लवकरात लवकर काम सुरू करू व गार्डन तयार करू, असे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी दिले. याप्रसंगी मनसे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अंकुश तापकीर व महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
पुणे-आळंदी पालखी महामार्गवरील चऱ्होली फाटा ते दिघी, दत्तनगर या परिसरातील मुख्य सेवा रस्त्याशेजारील अंदाजे ४ ते ५ किलोमीटर अंतरावरील गार्डन डीवाईडरचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या अर्धवट कामांमुळे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. १५ दिवसाच्या आत याबाबत महापालिकच्या उद्यान विभागाकडून कार्यवाही न झाल्यास, शहर मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत, महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती मनसेच्या भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी यावेळी दिली.