न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे तरुणांमध्ये आणि पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी & quot पीसीएमसी फेस्टीवल ऑफ फ्युचर” हा महोत्सव दिनांक २८ व २९ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजीत करण्यात केला आहे. पिंपरी- चिंचवड शहराला सर्वसमावेशक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आणि रहाण्यासाठी भारतातील सर्वात योग्य शहर बनवण्याच्या धोरणाचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. शहरातील स्टार्टअप आणि व्यावसायिक कौशल्ये वाढवणा-या व्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचे भविष्यातील तंत्रज्ञाना संदर्भातील ज्ञानात भर घालण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सन २०२० या वर्षातील पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा सर्वात महत्त्वाचा उपक्रम असुन सदर महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभुषन डॉ.रघुनाथ माशेलकर यांचे हस्ते व महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सदर महोत्सवाचे आयोजन ऑटोक्लस्टर, चिंचवड येथे करणेत आलेले असुन सदर महोत्सवामध्ये "हॅकेथॉन', "पीचफेस्ट', पिंपरी-चिंचवड परिसरातील टॉप २० इनोव्हेटीव्ह स्टार्टअपचे प्रदर्शन आणि यशस्वीपणे कंपन्या उभारणा-या उद्योजकांकडूनच त्यांच्या यशस्वी प्रवासाविषयी माहिती ऐकण्याची संधी देणारी व्याख्यानमाला अशा कार्यक्रमांचा समावेश या महोत्सवामध्ये करणेत आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे निमित्ताने पद्मविभुषन डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन देखील प्राप्त होणार आहे.
प्रस्तावित "पीसीएमसी फेस्टीवल ऑफ फ्युचर”अंतर्गत स्टार्टअपसाठी खालीलप्रमाणे प्रमुख चार महत्वाचे उपक्रम राबविले जाणार आहे. पीसीएमसी सिटीझन हॅकेथॉन–नव उद्योजक व विद्यार्थी यांनी नाविन्यपूर्णकल्पनांवर विचार करावा आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अडचणींवर नाविन्यपूर्ण उपाय सुचवावेत यासाठी घेण्यात येणार आहे. पीसीएमसी स्टार्टअप पिचफेस्ट – योग्य त्या स्टार्ट अपना यशस्वी होण्यासाठी तसेच त्यांचा विस्तार व्हावा यासाठी गुंतवणूक, पीओसी, कॉर्पोरेट आणिसरकार यांच्यापर्यत पोचण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे व मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देणे हे उदिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आहे.
पीसीएमसी स्पीकर सिरिज
पिंपरी-चिंचवड परिसरातील तरुणांना व्यावसायिक कौशल्ये यांसदर्भात शिक्षण आणिसंबंधित माहिती देण्यासाठी देशातील व परदेशातील यशस्वी उद्योजकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. सदर स्पिकर सिरिजमध्ये पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर, अक्षय मल्होत्रा, नैय्या सग्गी, डॉ. अपुर्व शर्मा, संदेश सॅलियन, विन्नी पॅट्रो, डॉ. अभय जेरे, हणमंत गायकवाड, उदयन कानडे, हिमांशु रतन, विशाल गोंडल, जितेंद्र चोक्से, सिद्धार्थ देशमुख, जे.ए. चौधरी, शेफ विष्णु मनोहर, लोव्हीना लिओर्नाडो, क्रिस रोझारिओ या नामवंत उद्योजगांचेबाबत बहुमुल्य मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.
पीसीएमसी स्टार्टअप शोकेस
पिंपरी-चिंचवड परिसरातील २० नाविन्यपूर्ण स्टार्टअप प्रदर्शित करणे भविष्यात आर्थिक विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे सर्व उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश:-
व्याख्यानमाला आणिस्टार्टअप प्रदर्शनांमुळे विद्यार्थांना तसेच नव उद्योजकांना स्वत:चा व्यवसायसुरू करण्याबाबत तसेच स्टार्टअप संदर्भातील सरकारचे उपक्रम याविषयी जागरुकता वाढविणे.
फ्युचर फेस्टीवलच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेल्यास्टार्टअपला संभाव्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांना भेटण्याची संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
पिचफेस्टच्या माध्यमातून स्टार्टअप्सना पिंपरी चिंचवडमध्ये येण्यास उद्युक्त करणे.
उत्तम निवडक स्टार्टअपना पीसीएमसी इन्क्युबेशन सेंटकमध्ये मदत उपलब्ध करून देणे.
हॅकेथॉनद्वारे नागरिकांच्या सहभागाने पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे. तसेच हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊन नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मांडण्यात आलेल्या कल्पनांमधील निवडक कल्पनांची अंमलबजावणी महानगरपालिका करणार असुन कल्पना मांडणा-या विद्यार्थी / नागरिक यांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिक देऊन त्यांचा गौरवही केला जाईल.
हॅकेथॉनमध्ये तीन विजेते निवडले जाणार असुन विजेत्यांना एकुण र. रु. ९ लाखापर्यंत बक्षिस देणेत येणार आहेत. तरी सदर महोत्सवामध्ये शहर व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिक यांनी सहभागी व्हावे, असे महानगरपालिकेतर्फे अवाहन करण्यात येत आहे.