न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड येथील नामांकित डॉ. वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग, मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डी येथे व्दितीय वर्ष मॅकेनिकल विभागात शिकत असणाऱ्या समृद्धी मारुती मुळूक हिने नुकत्याच रशिया (मॉस्को) येथे पार पडलेल्या “मिस इंडिया रशिया सौदर्य” स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत मिस इंडिया रशिया हा ‘किताब’ पटकावला.
या स्पर्धेचे आयोजन रशिया (मॉस्को ) येथे १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या स्पर्धकांमधून तिने या स्पर्धेत प्रथम येऊन मिस इंडिया रशिया हा बहुमान पटकावला.
तिच्या ह्या घवघवीत यशाबद्दल डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (निवृत्त) एस के जोशी, प्राचार्यां डॉ. सौ. अनुपमा पाटील, कुलसचिव श्री वाय के पाटील व मॅकेनिकल विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल डंभारे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.