न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च २०२०) :- एसटी रोड दापोडी येथे एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून राजकुमार याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी २५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करत राजकुमार याला अटक केली.
राजकुमार गोकुळ घुटे (वय १९, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समीर लक्ष्मण रासकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.











