न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च २०२०) :- आरोपींची कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे तळवलकर जिम होती. आरोपींनी नागरिकांकडून जिममध्ये पुढील काही महिन्यांचा आगाऊ प्रवेश करून घेतला. त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले. फिर्यादी यांच्याकडून ८९९९ रुपये घेतले.
मानविंदर दयाराम सिंग (रा. पिंपळे सौदागर) यांच्याकडून पुढील एक वर्षाचे ८९९९ रुपये, सिद्धार्थ मोहन दहेलकर (रा. पिंपळे गुरव) यांच्याकडून पुढील सहा महिन्यांचे आठ हजार रुपये, विकास जितेंद्र कम्बोज यांच्याकडून १२ हजार रुपये, संध्या आव्हाड यांच्याकडून १० हजार रुपये, विकास पटेल यांच्याकडून १२ हजार रुपये असे एकूण ५९,९९८ रुपये आरोपींनी घेतले. हा प्रकार २१ नोव्हेंबर २०१८ ते २ मार्च २०२० या कालावधीत तळवलकर जिम, कोकणे चौक पिंपळे सौदागर येथे घडला.
निलेश शंकर वाडेकर, संजीव सुरेश कदम अशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय जुगलकिशोर वर्मा (वय ३७, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक फेब्रुवारी २०२० रोजी जिम बंद करून नागरिकांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.















