न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२०) :- निगडी-आकुर्डी परिसरात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर ब्रिगेडची पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौरांकडे केली आहे. त्यांनी याबाबत महापौरांना पत्र दिले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, निगडी – दुर्गा माता मंदिर, सर्व्हे क्रमांक ८ / १ येथील नागरिकांच्या मागणीला अनुसरून संबंधित परिसरात गल्लीबोळातून वेळ प्रसंग ओढवल्यास तरतूद म्हणून फायर ब्रिगेडची पाइपलाइन करून देण्याची मागणी केली आहे. अशाच प्रकारची परिस्थिती प्रभाग क्रमांक १५ मध्ये गुरुदेवनगर, पंचतारानगर, आकुर्डी गावठाण परिसरात आहे.
तसेच, शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसेल. तरी, एक सर्वेअर नेमून त्याचा अभ्यास करावा. संपूर्ण शहरात फायरलाइन टाकून स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून प्रकल्प कार्यरत करावा. असे या पत्रात शैलजा मोरे यांनी म्हटले आहे.















