न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रूपेश जाधव याला पिंपरी येथील न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी ३ वर्ष सक्तमजुरीची व १२०००/- दंडाची शिक्षा सुनावली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने साधना बाळासाहेब बोरकर (पाटील) यांनी खटल्यांचे कामकाज पाहिले.
फिर्यादी नाव बदलेले (कूसूम) हिने लग्नाला नकार देऊनही आरोपी रूपेश जाधव फिर्यादीला नेहमी त्रास देत असे तिचा पाठलाग करत असे. याबाबत फिर्यादीने चिंचवड पोलिस ठाण्यात २०१४ मध्ये धाव घेतली होती. (सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट – अ) साधना बाळासाहेब बोरकर यांनी आरोपीच्या उलट तपासात एकतर्फी प्रेमाची बाब पिंपरी येथील न्यायाधीश डी. आर. पठाण या न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली होती व सरकारच्या वतीने साक्षीदार तपासले होते.
पिंपरी न्यायालयात या गुन्हयात ३ वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा तसेच, १२०००/- दंडांची शिक्षा व दंड न भरल्यास १ महिना अधिक सक्तमजूरी तसेच फिर्यादी यांना नुकसान भरपाई १००००/- रुपये देण्याची शिक्षा पिंपरीचे न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी आरोपी रूपेश जाधव याला ठोठावली आहे.
या गुन्हयाची सुनावणी पिंपरी न्यायालयात झाली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता साधना बाळासाहेब बोरकर यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडली तर पैरावी म्हणून हवालदार सी. एच साबळे चिंचवड पोलिस स्टेशन यांनी काम पाहिले तर गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक चिंचवड निता मिसाळ यांनी केला.












