न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- काटे यांचे शितळादेवी चौक, दापोडी येथे हॉटेल आहे. रविवारी दुपारी काटे त्यांच्या हॉटेलमध्ये बसलेले असताना हॉटेलसमोरील गॅरेजजवळ गॅरेजमध्ये काम करणा-या कामगाराला पंक्चर काढण्यावरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होते. ही भांडणे सोडविण्यासाठी काटे गेले असता आरोपींनी त्यांना देखील गॅरेजमधील टॉमीने मारहाण केली.
तसेच काटे यांच्या हातातील एक लाख ४० हजार रुपयांचे पाच तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट जबरदस्तीने चोरून नेले. यामध्ये काटे यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (दि. ८ ) दुपारी दोन वाजता शितळादेवी चौक, दापोडी येथे घडली.
सतीश सदाशिव काटे (वय ५१, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित बाळासाहेब कांबळे, आकाश संजय कांबळे (दोघे रा. महात्मा फुले नगर, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












