न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- चिंचवडमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला दिन साधेपणाने साजरा झाला. कोरोना या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव समाजामध्ये पसरू नये, म्हणून यंदा महिलांनी होळी न खेळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जोखमीच्या कामांसह आज सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत आहेत. मात्र नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतांना महिलांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, असे आवाहनही कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य शहनाज कोटार यांनी केले.
या वेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य अर्चना करंडे, मनिषा घोसर्वावडे, नाशिता शेख, पुजा लोबो, प्रणाली चौधरी, दीप्ती लगड, वैशाली रांसुबे, माधुरी राणे, स्मिता घागरे, स्मिता पवार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


















