न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- जागतिक महिला दिनानिमित्त माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने चिखलीतील जाधववाडी परिसरात खास महिला भगिनींसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला भगिनींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या महिलेस एलसीडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ व मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या सुकन्या साक्षी लांडगे, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव, प्रीती बोंडे, संगीता भोसले, सोनम जांभळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घारे, रवी जांभुळकर, महेंद्र मंडलिक, प्रताप भांबे, रवी भूजबळ आदी कार्यकर्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















