न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- सद्यस्थितीत पुण्यात करोना विषाणु आजाराचे रुग्ण आढळुन आलेले आहेत. या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिष्टाचार दि. १० मार्च, २०२० पासुन लागु करणेत येत आहे. करोना विषाणु आजाराचे ( COVID – 19 ) अनुषंगाने कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दि. ०१ / ०२ / २०२० रोजी करोना या विषाणुबाबतच्या रुग्णांसाठी १० बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असुन सदर विलगीकरण कक्षात ५ बेड महिलांसाठी तर ५ बेड पुरुषांसाठी राखीव आहेत व २ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या नविन भोसरी रुग्णालयाचे इमारतीमध्ये ४० बेडसचे करोनो विलगीकरण शिबिर ( Corona Quarantine Camp ) तयार करण्यात आलेले आहे. तसेच पिं. चि. मनपा मधील विविध ७ खाजगी हॉस्पीटलमध्ये एकण ४८ आयसोलशन बेडसह ०७ व्हेंटिलेटर तयार ठेवणेत आलेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग तथा सर्व रुग्णालयामध्ये करोना विषाणु आजारा विषयी माहिती देणेकरीता अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी व सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये चीन व इतर देशातुन आलेल्या प्रवाशांचा १४ दिवस वैद्यकिय विभागामार्फत राज्यशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत एकुण ३१ प्रवाश्यांचा पाठपुरावा वैद्यकीय विभागामार्फत केला असून त्यापैकी २० प्रवाश्यांचे पाठपुराव्याचे १४ दिवस पुर्ण झाले असून वरीलपैकी कोणत्याही प्रवासी यांस कोरोना आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच या व्यतिरीक्त ५ संशयित प्रवाश्यांना य. च. स्मृ. रुग्णालयामधील करोना आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करुन त्यांचे घशातील द्रावाचा नमुना एनआयव्ही पुणे येथे पाठविला असून अहवाल प्रलंबित आहेत. करोना या आजाराविषयी पिं . चिं . मनपाच्या सर्व वैद्यकिय अधिकारी तसेच खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच आयएमए, पीडीडीए, निमा या वैद्यकीय संघटना यांची कार्यशाळा वैद्यकीय विभागामार्फत घेण्यात आलेली आहे.
पिं . चिं . मनपा कार्यक्षेत्रातील खासगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच आयएमए, पीडीडीए, निमा या वैद्यकीय संघटना यांची कार्यशाळा वैद्यकीय विभागामार्फत घेण्यात आलेली आहे. पिं. चिं. मनपा कार्यक्षेत्रातील खासगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच आयएमए, पीडीडीए, निमा या वैद्यकीय संघटना यांना दि. ०६ / ०२ / २०२० रोजी ज्या देशात करोना विषाणुचा उद्रेक झालेला आहे अशा देशातुन आलेल्या प्रवाशांची माहिती ईमेलव्दारे या कार्यालयास कळविणेकामी पत्र देण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड मनपा मार्फत जनजागृती करण्यात आलेली आहे.
सर्व मोठे चौक, प्रभाग कार्यालये, पिंपरी चिंचवड दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये इत्यादी १६४ ठिकाणी १०x१० आकाराचे मोठे फ्लेक्स दि. ३ – ०२ – २०२० पासून प्रदर्शित केलेले आहेत. १५००००० हस्तपत्रिका वाटप तसेच ५००० स्टिकर्स, ५००० पोस्टर्स सर्व खासगी दवाखाने व रुग्णालये याठिकाणी चिटकविण्यात येत आहेत.















