न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२०) :- केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रोडवर फिनोलेक्स कंपनीच्या कंपाउंडजवळ मोहननगर येथे सापळा रचून मंगेश पालवे याला अटक केली.
त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. मंगेश नामदेव पालवे (वय २९, रा. रिहे मोरेवाडी, ता. मुळशी) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दोनचे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव कापसे यांनी फिर्याद दिली आहे.
तसेच पोलिसांनी अमोल अशोक भेगडे (वय ३०, रा. घोटवडे, ता. मुळशी) याला अटक केली आहे. बिर्ला हॉस्पिटलकडून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या रोडवर वाल्हेकरवाडी कॉर्नर येथे पोलिसांनी अमोल भेगडे याला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.












