न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२०) :- करोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, प्रशासनानं त्यांची नावं उघड न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांकडून सोशल मीडियात करोनाचा संसर्ग झालेल्यांची नावं पसरवली जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनानं कडक भूमिका घेतली असून, अशा पद्धतीनं नावं उघड करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई केली जाणार आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी ही माहिती दिली.
हे रुग्ण राहत असलेल्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नागरिकांकडून करोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना वेगळी वागणूक देण्याचाही प्रकार काही ठिकाणी घडला.
मात्र, त्यापूर्वीच पुणे विभागीय प्रशासनानं करोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सोशल माध्यमातून त्यांची नावं जाहीर केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक निर्णय घेतला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.












