न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड परीसरातील शववाहीनी पुष्पकचे सर्व कामकाज पिंपरीतील नेहरुनगर आगार येथुन सुरु करण्यात आले आहे. याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे समन्वयक अधिकारी यांनी प्रसिद्धीस निवेदन दिले आहे.
यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड परीसरातील शववाहीनी-पुष्पक वर्दी संबंधातील सर्व कामकाज मुख्यालय क्रं. २, पिंपरी येथुन चालत आहे. मात्र, नागरीकांची तातडीने सोय होणेचे दृष्टीने पिंपरी चिंचवड परीसरातील शववाहीनी पुष्पकचे संपुर्ण कामकाज आता पिंपरीतील नेहरुनगर आगार येथुन सुरु करणेबाबत मा. वाहतुक व्यवस्थापक यांचेमार्फत आदेश निर्गत करण्यात आले आहेत.
नागरीकांनी पुष्पक शववाहीनीकरीता पुष्पक लेंन्डलाईन (ऑफीस) ०२० – २७१२२७२७, सकाळपाळी गॅरेज सु. वा. (श्री. आदमाने) मो नं. ९६२३८५१५२५, दुपारपाळी गॅरेज सु. वा. (श्री. गायकवाड) मो नं. ९९२५७५५१५०, आगार व्यवस्थापक (श्री. रांजणे) मो नं. ९६८९९३४२५९ या दूरध्वनी नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.