न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- भाडे वाढवून न दिल्याने जिमचे कुलूप तोडून आतील साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी तसेच गल्ल्यातील आठ हजार रुपये नेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना भोसरी येथे घडली. या प्रकरणी अनिल अशोक फुगे ( ३८ , रा . फुगे तालीमजवळ , भोसरी ) यांनी शनिवारी ( दि . १४ ) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत पोपट फुगे ( वय ३५ ) , सम्राट पोपट फुगे ( ३० . दोघेही रा . दिघी रोड , भोसरी ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल फुगे हे जिममध्ये ट्रेनर आहेत. त्यांनी भाडे वाढवून दिले नाही या कारणावरून प्रशांत व सम्राट फुगे यांनी संगनमताने जिमचे कुलूप तोडून जिममधील साहित्याचीही तोडफोड केली. त्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच, गल्ल्यातील आठ हजार रुपये चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.















