न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- पिपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये करोना विषाणूचा संसर्ग रोखणेकामी युद्धपातळीवर कामकाजाची आखणी करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने महानगरपालिका स्तरावर सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे, हस्तोदोलन न करणे, सुरक्षित अंतर ठेऊन संभाषण करणे, १ – २ तासाने साबण अथवा नियमितपणे हात धुणे इ. बाबी पाळणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘ कोरोना ‘ विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी या आदेशान्वये ‘जलद प्रतिसाद टिम’ (Rapid Response Team ) स्थापन करण्यात येत आहे.
या टिममध्ये एकूण २ कर्मचारी कार्यरत राहतील. सदरच्या टिम शहरातील विविध भागामध्ये कार्यरत असतील. टिमने करावयाच्या कामकाजाच्या वेळा, संदर्भात द्यावयाचे प्रशिक्षण, आवश्यक सूचना डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे देतील. या टिम मधील प्रत्येक कर्मचा – यांना त्या त्या विभागप्रमुखांनी तातडीने संपर्क साधून Email. Whats Up. समक्ष अथवा फोनद्वारे संपर्क साधून आदेश बजवावेत. डॉ . के . अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येक कर्मचा-याना टिममध्ये विभागून कामकाजाचा भाग वाटून देणे, कामकाजाच्या वेळा ठरविणे, कामकाज करून घेण्याची तातडीने व्यवस्था करावी.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखणे ही बाब राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली असल्याने प्रत्येकाने कोणत्याही सबबी न सांगता सोपविणेत आलेले कामकाज प्रामाणिकपणे करावयाचे आहे. याकामी वरिष्ठ अधिका-यांनी कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्यास कर्मचा-यांनी कोणत्याही सबबी न सांगता ताबडतोब कामावर उपस्थित रहायचे आहे. प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी. उपरोक्त नमूद कामकाजासाठी ( Rapid Response Team ) नियुक्त केलेले कर्मचारी प्रपत्र ” अ ” प्रमाणे आहेत. या आदेशान्वये प्रपत्र ” अ ” येथील नमूद निदेशक, क्रिडा शिक्षक, मल्टी पर्पज वर्कर व ‘ ए. एन. एम. पदावरील कर्मचारी यांनी दिनांक १७ / ०३ / २०२० रोजी दुपारी १२. ०० वाजता तसेच सहाय्यक शिक्षक व उपशिक्षक कर्मचा-यांनी दुपारी २ . ०० वा . प्रशिक्षणासाठी ऑटो क्लस्टर चिंचवड ठिकाणी उपस्थित रहावयाचे आहे. डॉ. साळवे, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी नियुक्ती केलेल्या कर्मचा-यांना कामकाजाचे अनुषंगाने प्रशिक्षण देण्याबाबत व्यवस्था करावी. नियुक्त केलेल्या कर्मचा-यांपैकी गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर आपत्ती व्यवस्थापन नियम -२००५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा आदेश महापालिका आयुक्त यांनी पत्राद्वारे दिला आहे.















